बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दररोज चर्चेत असतो. पण यावेळी डब्ल्यूडब्ल्यूईचा स्टार अंडरटेकरमुळे हा अ‍ॅक्शन हिरो चर्चेत आला आहे. होय, त्याच्या ‘खिलाडीओं का खिलाडी’ या अ‍ॅक्शन फिल्ममध्ये अक्षयने एका सामन्यात अंडरटेकरला पराभूत केले.

मात्र, यावेळी अक्षय कुमारने अंडरटेकरच्या पोस्टला अतिशय मजेदार पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे. जी चाहत्यांना खूपच आवडली आहे .

अक्षय कुमारची मजेदार शैली

अलीकडे अंडरटेकरने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘होय! खर्‍या सामन्यासाठी तुम्ही कधी तयार आहात ते सांगा. अंडरटेकरच्या या पोस्टवर अक्षय कुमारने खूप मजेदार कमेंट केली आहे.

Advertisement

अक्षय कुमारने लिहिले, ‘मला माझा विमा तपासू दे, भाऊ, मी नंतर सांगेन’. डब्ल्यूडब्ल्यूईने आपल्या कमेंटचा फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बॉलिवूड प्लेयरची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली असून चाहते या पोस्टवर जोरदार कमेंट करत आहेत.

अक्षय कुमारने याअगोदरच्या त्याच्या चित्रपटात ज्याच्यासोबत लढाई केली होती , तो अंडरटेकर नव्हता, परंतु चित्रपटामध्ये अंडरटेकरची भूमिका निभावणारा ब्रायन ली होता . अक्षयने ट्विटरवर याचा खुलासा केला होता. त्यानी लिहिले की, ‘खिलाडीओं का खिलाडी’ उद्या 25 वर्षे पूर्ण करेल. या निमित्ताने एक गमतीशीर सत्य म्हणजे तो कुस्तीपटू ब्रायन ली होता ज्याने चित्रपटात अंडरटेकरची भूमिका केली होती.

Advertisement