पुणे – पुणे शहर आणि परिसरात सध्या गुन्हेगारीचं (Crime Rate) प्रमाणात मोठ्या संख्येनं वाढत असून, अनेक तरुण मुलं या गुन्हेगारीच्या जाळ्यात (Crime Rate) अडकत चालायचं दिसून येत आहे. आणि याच कारणामुळे शहरात दिवसागणतीत अनेक लहान-मोठे गुन्हे घटना दिसून येतात. नुकतंच आकुर्डीतील (Akurdi News) खंडोबा माळ चौकात एक धक्कादाय प्रकार घडला असून, या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहे.

उबर रिक्षा चालकाला दोघांनी कमरेच्या बेल्टने मारहाण करून त्यांची रिक्षा चोरून नेली आहे. हा प्रकार रविवारी आकुर्डीतील (Akurdi News) खंडोबा माळ चौकात मध्यरात्री घडला आहे.

याप्रकरणी इम्रान अब्दुलशिद शेख (वय 35 रा.बोपोडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञाता (वय अंदाजे 20 ते 25) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे उबर रिक्षाचे भाडे घेऊन खंडोबामाळ चौक येथे आले असता, त्यांचा पाठलाग करत आरोपी दुचाकीवरून आले, त्यांनी फिर्यादीच्या जवळ येत फिर्यादी यांना रिक्षातून ओढून बाहेर काढले.

यावेळी त्यांनी काहीही कारण नसताना फिर्यादी यांना कमरेच्या बेल्टने व लाथा बुक्क्कयांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या ताब्यातील 30 हजार रुपयांची रिक्षा जबरदस्तीने घेऊन गेले. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका तरूणाने पी. एम.पी.एम.एल. बस चालकाला अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण (Crime) केल्याची घटना पिंपरी चिंचवड भागात घडली होती.

बसच्या आडवी येणारी दुचाकी काढायला सांगितली म्हणून या तरुणाने थेट बसमध्ये चढून चालकाला बेदम मारहाण (Crime) केली होती. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

पिंपरीतील नेहरू नगर परिसरातील संतोषी माता चौकामध्ये भर दिवसा हा प्रकार घडला होता. “तुला माहित आहे का, मी कोण आहे ? असं म्हणत किरकोळ वादातून या तरुणाने बस मध्ये प्रवेश करत बस चालकाला बेदम मारहाण केली होती.