आळंदी – कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा (dnyaneshwar sanjivan samadhi sohala) उत्सवा दरम्यान आळंदी (Alandi news) आणि इतर परिसरात सध्या उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कालपासून म्हणजेच, दि.17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान हा उत्सव असणार असून, यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांचे अलंकापुरीत (Alandi news) आगमन झाले आहे. ‘जय जय रामकृष्ण हरी’ आणि माउलींच्या नामाच्या जयघोषाने इंद्रायणीचे काठ दुमदुमले आहे.

करोनानंतर (Corona) पहिल्यांदाच ही कार्तिकी एकादशी पार पडणार असल्यामुळे लाखो वारकरी आळंदीत (Alandi news) दाखल झाले आहेत. अलंकापुरीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. सकाळी श्रीगुरु हैबतबाब यांच्या पायरी पुजनाने या सोहळ्याला सुरुवात झाली.

यंदा करोनामुक्त यात्रा होत असल्याने 10 ते 12 लाख भाविक अलंकापुरीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यातील अनेक दिंड्यांच्या समावेश असणार आहे. त्यातीत अनेक दिंड्या आळंदीत दाखल देखील झाल्या आहेत.

स्थानिक प्रशासनाकडून माउलींच्या कार्तिकी यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा कार्तिकी यात्रेचा कालावधी 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा आहे.

तर, माउलींचा संजीवन समाधी सोहळा 22 नोव्हेंबरला साजरा होईल. अस ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुणे महामंडळ परिवहन मंडळाकडून आळंदी यात्रेसाठी 17 ते 13 नोव्हेंबरपर्यंत 300 जादा बसचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार रात्री उशिरापर्यंत या बस सुरु असणार आहेत.

या यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून भाविक पुण्यात आणि आळंदीत दाखल होतात. त्यांच्या सेवेसाठी दरवर्षी पीएमपीएमएल प्रशासन सज्ज असतं.

तर श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा उत्सव उत्साहात भक्तिमय, वातावरणात, शांततेत, (Alandi news) निर्विघ्नपणे पार पडावा या करिता चिंचवड येथील

आयुक्तांलयाकडून सहा.पोलीस (Police) आयुक्त 8 पोलीस ,निरीक्षक 50,पोलीस उपनिरीक्षक 193,पोलीस अंमलदार 1250,वाहतूक पोलीस अंमलदार 250,होमगार्ड 650,असा बंदोबस्त असणार आहे.