आळंदी – कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (dnyaneshwar sanjivan samadhi sohala) उत्सवा दरम्यान आळंदी आणि परिसारातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालावी म्हणून आळंदीत (Alandi news) दिंड्यांसोबत येणारी वाहने तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस (Police) आयुक्तालयातील आळंदी (Alandi news) व दिघी पोलीस (Police) स्टेशन हद्दीत दि.17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान हा उत्सव असणार आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा उत्सव उत्साहात भक्तिमय, वातावरणात, शांततेत, (Alandi news) निर्विघ्नपणे पार पडावा या करिता काही बदल करण्यात आले आहे.

चिंचवड येथील आयुक्तांलयाकडून सहा.पोलीस (Police) आयुक्त 8 पोलीस ,निरीक्षक 50,पोलीस उपनिरीक्षक 193,पोलीस अंमलदार 1250,वाहतूक पोलीस अंमलदार 250,होमगार्ड 650,असा बंदोबस्त असणार आहे.

तर दुसरीकडे एसआरपीएफ च्या 3 कंपन्या, एनडीआरएफ च्या 2 तुकड्या ,बीडीडीएस चे 2 पथके मदतीला पाचारण करण्यात आले आहेत. या सोहळ्यासाठी नगरपालिका, देवस्थान, पोलीस (Police) प्रशासनांकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे.

इंद्रायणी नदीपलीकडील जागेत दर्शनबारी उभारण्यात आली आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या जवळच्या दोन मजली दर्शनबारी उभारली आहे. कार्तिकी यात्रेच्या दरम्यान घातपाताची शक्यता होवू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे, धातुशोधक यंत्रणा, तपासणी यंत्रणा बसवली आहे.

देवस्थानचे सुरक्षा रक्षक आणि आळंदी पोलिसांच्यावतीने महाद्वार, पानदरवाजा, दर्शनबारी, पंखा मंडप, वीणामंडप, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा, इंद्रायणी घाट, भक्ती सोपान पूल याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, यामध्ये महिला पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त आहे.

दरम्यान, कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने भाविकांचे वाहनां करिता पिवळ्या रंगाच्या व स्थानिकांचे वाहनां करिता गुलाबी रंगाचे असे वेगवेगळे पास तयार करण्यात आले असून ज्या भाविकांना व स्थानिकांना पास पाहिजे असल्यास त्यांनी आळंदी पोलीस स्टेशन ला अर्ज करून पास प्राप्त करून घ्यावा.

यात्रा कालावधीत दि.19 ,20,21,22 तारखांना आळंदी (Alandi news) शहरात रस्त्यावर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांनी तसेच भाविकांना आपली वाहने 19 तारखेच्या आत आपली वाहने पार्किंगचे ठिकाणी लावावीत परत ती शक्यतो बाहेर काढू नयेत. असे आवाहन पोलीस (Police) प्रशासनाकडून करण्यात आले आहे.