आळंदी – कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (dnyaneshwar sanjivan samadhi sohala) उत्सवा दरम्यान आळंदी आणि परिसारातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालावी म्हणून आळंदीत (Alandi news) दिंड्यांसोबत येणारी वाहने तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस (Police) आयुक्तालयातील आळंदी (Alandi news) व दिघी पोलीस (Police) स्टेशन हद्दीत दि.17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान हा उत्सव असणार आहे.

यावेळी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन आळंदी पोलिस (Alandi news) ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा उत्सव उत्साहात भक्तिमय, वातावरणात, शांततेत, (Alandi news) निर्विघ्नपणे पार पडावा या करिता काही बदल करण्यात आले आहे.

यावेळी मोशी-देहू फाटा रस्ता बंद असणार आहे. डुडुळगाव जकात नाका हवालदार वस्ती येथे नाकाबंदी केली जाणार असून, मोशी ते चाकण ते शिक्रापूर हा मार्ग तसेच मोशी भोसरी ते मॅगझीन चौक, दिघी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

चाकणकडून (आळंदी फाटा) येणारी वाहने आळंदी रस्त्यावर इंद्रायणी हॉस्पिटलजवळील आळंदी फाटा हनुमानवाडी येथे नाकाबंदी करण्यात येणार आहे.

मॅगझीन चौक येथे नाकाबंदी करण्यात येणार असून, वाहनचालकांनी पुण्याहून येणारी वाहने दिघी मॅगझीन चौक-भोसरी-मोशी-चाकण मार्गाचा वापर करावा.

मरकळ रस्त्यावरील वाहनांनी बाह्यवळण मार्गाचा वापर करावा. धानोरे फाटा येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग मरकळ-सोळू-धानोरे-चऱ्होली खुर्द बाह्यवळण मार्गाने चऱ्होली बुद्रुक मार्गे वाहने पुणे येथे जातील.

दरम्यान, यावेळी चिंचवड येथील आयुक्तांलयाकडून सहा.पोलीस (Police) आयुक्त 8 पोलीस ,निरीक्षक 50,पोलीस उपनिरीक्षक 193,पोलीस अंमलदार 1250,वाहतूक पोलीस अंमलदार 250,होमगार्ड 650,असा बंदोबस्त असणार आहे.

अवजड वाहनांना हेही रस्ते बंद.!

  • मोशीतील गावठाण चौक आणि भारतमाता चौक येथून येण्यास बंदी
  • नाशिक महामार्गावरील चिंबळी फाटा चौकातून चिंबळी गावठाण मार्गे रस्ता बंद
  • देहूरोड येथील देहू कमानीतून देहूगावाकडे जाण्यास बंदी
  • तळेगाव चाकण रस्त्यावरील देहू फाटा येथून देहूगावाकडे जाण्यास बंदी
  • निघोजे-महाळुंगे येथून महिंद्रा सर्कलकडून तळवडे आयटी पार्ककडे जाणारा रस्ता