आळंदी – कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (dnyaneshwar sanjivan samadhi sohala) उत्सवा दरम्यान आळंदी (Alandi news) आणि परिसारातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालावी म्हणून आळंदीत (Alandi news) दिंड्यांसोबत येणारी वाहने तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

आजपासून म्हणजेच, दि.17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान हा उत्सव असणार असून, यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांचे अलंकापुरीत (Alandi news) आगमन झाले आहे.

‘जय जय रामकृष्ण हरी’ आणि माउलींच्या नामाच्या जयघोषाने इंद्रायणीचे काठ दुमदुमले आहे. स्थानिक प्रशासनाकडून माउलींच्या कार्तिकी यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.

त्यामुळे सगळ्यांना आता गुरुवारपासून सुरू होणाऱ्या कार्तिकी यात्रेचे वेध लागले आहेत. दरम्यान, यन्सच्या या यात्रेसाठी तब्बल तीन लाख भाविक येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे.

“यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर कार्तिकी यात्रेचा सोहळा होत असल्याने भाविकांमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण आहे’. अस ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितलं आहे.

यंदा कार्तिकी यात्रेचा कालावधी 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा आहे. तर, माउलींचा संजीवन समाधी सोहळा 22 नोव्हेंबरला साजरा होईल. रविवारी (20 नोव्हेंबर) कार्तिकी एकादशी आहे.

यावेळी आळंदीत संस्थान कमिटीने विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. पोलिस बंदोबस्त, पाणी, वीज, आरोग्य सुविधा असतील.

तसेच, श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा उत्सव उत्साहात भक्तिमय, वातावरणात, शांततेत, (Alandi news) निर्विघ्नपणे पार पडावा या करिता काही बदल करण्यात आले आहे.

दरम्यान, यावेळी चिंचवड येथील आयुक्तांलयाकडून सहा.पोलीस (Police) आयुक्त 8 पोलीस ,निरीक्षक 50,पोलीस उपनिरीक्षक 193,पोलीस अंमलदार 1250,वाहतूक पोलीस अंमलदार 250,होमगार्ड 650,असा बंदोबस्त असणार आहे.