आळंदी – कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा (dnyaneshwar sanjivan samadhi sohala) उत्सवा दरम्यान आळंदी (Alandi news) आणि इतर परिसरात सध्या उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कालपासून म्हणजेच, दि.17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान हा उत्सव असणार असून, यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांचे अलंकापुरीत (Alandi news) आगमन झाले आहे. ‘जय जय रामकृष्ण हरी’ आणि माउलींच्या नामाच्या जयघोषाने इंद्रायणीचे काठ दुमदुमले आहे.

करोनानंतर (Corona) पहिल्यांदाच ही कार्तिकी एकादशी पार पडणार असल्यामुळे लाखो वारकरी आळंदीत (Alandi news) दाखल झाले आहेत. अलंकापुरीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. सकाळी श्रीगुरु हैबतबाब यांच्या पायरी पुजनाने या सोहळ्याला सुरुवात झाली.

यंदा करोनामुक्त यात्रा होत असल्याने 10 ते 12 लाख भाविक अलंकापुरीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यातील अनेक दिंड्यांच्या समावेश असणार आहे. त्यातीत अनेक दिंड्या आळंदीत दाखल देखील झाल्या आहेत.

दरम्यान, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीमधील माऊलींच्या मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या स्वागतासाठी फुल सजावट करण्यात येत आहे. त्याची लगबग मंदिरामध्ये दिसून येत आहे.

फुल सजावट कामगार अष्टर, झेंडू इतर विविध फुलांपासून, वस्तूपासून तोरण व विविध आकर्षक अणि नयनरम्य सजावटीच्या कामात येथे मग्न आहेत. कार्तिकी यात्रेनिमित्त मंदिराच्या महाद्वारात व मंदिरामध्ये ठिकठिकाणी आकर्षक अशी फुलसजावट करण्यात येणार आहे.

मंदिरातील आकर्षक, नयनरम्य फुलसजावट पाहून वारकरी भाविक व आळंदीकर नागरिकांचा तो कौतुकाचा विषय ठरतो. मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली गेली आहे.

मंदिरामध्ये नियोजनबद्ध आरोग्य सेवा उपलब्ध करून ठेवली आहे. मंदिरामध्ये व तेथील परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यंदा कार्तिकी यात्रेचा कालावधी 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा आहे. तर, माउलींचा संजीवन समाधी सोहळा 22 नोव्हेंबरला साजरा होईल.