आळंदी – कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज 726 वा संजीवन समाधी सोहळा (dnyaneshwar sanjivan samadhi sohala) उत्सवा दरम्यान आळंदी (Alandi news) आणि इतर परिसरात सध्या उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच, दि.17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान हा उत्सव असणार असून, यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांचे अलंकापुरीत (Alandi news) आगमन झाले आहे. ‘जय जय रामकृष्ण हरी’ आणि माउलींच्या नामाच्या जयघोषाने इंद्रायणीचे काठ दुमदुमले आहे.

करोनानंतर (Corona) पहिल्यांदाच ही कार्तिकी एकादशी पार पडणार असल्यामुळे लाखो वारकरी आळंदीत (Alandi news) दाखल झाले आहेत. अलंकापुरीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे.

यंदा करोनामुक्त यात्रा होत असल्याने 10 ते 12 लाख भाविक अलंकापुरीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यातील अनेक दिंड्यांच्या समावेश असणार आहे. त्यातीत अनेक दिंड्या आळंदीत दाखल देखील झाल्या आहेत.

त्यामुळे इंद्रायणी नदी घाट दुतर्फा पूर्णपणे भाविक वारकऱ्यांनी भरून गेला आहे. पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी येथे झाली आहे.

पालिका प्रशासनातर्फे इंद्रायणी घाटावर महिलांसाठी चेजिंग रूम व्यवस्था करण्यात आली आहे. नदीपात्रात दुर्घटना घडू नये, याकरीता आपत्ती व्यवस्थापन व एन डी आर एफ टीम इंद्रायणी नदी पात्रात बोटीसह सज्ज होती.

वैतागेश्वर मंदिराशेजारील (नदीपलीकडील) दर्शनबारी पूर्णपणे भरली असून तिची रांग बाहेर आराधना हॉटेलच्या पुढे गेली होती. इंद्रायणीच्या घाटावरती टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊलींच्या नामघोषात भाविक वारकरी (Alandi News)येत आहेत.

डोक्यावर श्री विठ्ठल मूर्ती, संत ज्ञानेश्वर महाजांची मूर्ती, श्री ज्ञानेश्वरी, तुळशी वृंदावन, खांद्यावर पताका असे दृश्य ठिकठिकाणी दिसत आहे. प्रदक्षणा रस्ता, वडगांव रस्ता, चाकण इ.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना दिसत आहे.

यंदा कार्तिकी यात्रेचा कालावधी 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा आहे.तर, माउलींचा संजीवन समाधी सोहळा 22 नोव्हेंबरला साजरा होईल. अस ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुणे महामंडळ परिवहन मंडळाकडून आळंदी यात्रेसाठी 17 ते 13 नोव्हेंबरपर्यंत 300 जादा बसचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार रात्री उशिरापर्यंत या बस सुरु असणार आहेत.