आळंदी – करोनाच्या (corona) संकटामुळे आषाढीच्या पायी वारीला (Ashadhi Wari) खंड पडलेला होता. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता करोना (corona) आवाक्यात आलाय, म्हणूनच पुन्हा एकदा भाविक आपल्या लाडक्या विठूरायाची भेट घेण्यासाठी पंढरपूरला (pandharpur) रवाना झाले आहेत. 

दोन दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. मात्र, अश्यातच माउलींच्या आळंदीत (Alandi) एक मोठी समस्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

तीर्थ म्हणून ज्या पवित्रा इंद्रायणी चे पाणी प्राशन करतात तीच इंद्रायणी (alandi indrayani) नदी प्रदूषित असून सुद्धा प्रशासन यावर कोणतेही उपाय योजना करत नसल्याने वारकरी आणि नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

इंद्रायणी नदी मध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी दिसून येत आहे त्याचबरोबर मागील दोन दिवसांपासून संपूर्ण नदीपात्रावर साबण्याच्या फेसाप्रमाणे पांढऱ्या फेसचा थर निर्माण झाला आहे.

त्यावर देखील प्रशासन कोणतीच उपाय योजना करत नसल्याचं सध्या चित्र आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

महापालिका हद्दीतील क्षेत्रातून गेली काही वर्षे सातत्याने सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी नदीपात्रात कोणतीही प्रक्रिया न करत सोडले जाते.

मात्र यावर आळंदी (alandi indrayani) पालिका अथवा कोणीही आवाज उठवित नाही. महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडून कारवाई केली जात नाही.

गेली दोन दिवसांपासून महापालिका हद्दीतून जलपर्णी वाहत आळंदी च्या तटावर आली आहे. जलपर्णी थांबत नाही तोपर्यंत रसायनयु्क्त सांडपाणी सुरू झाले.

आज पहाटेपासून नदीपात्रातील पाण्याला फेस येत होता. सुरूवातीला प्रमाण थोडे होते. मात्र सकाळपासून फेस येण्याचा प्रकार वाढला.

संपूर्ण नदीपात्रात (alandi indrayani) फेसयुक्त पाण्याचा प्रवाह वाहू लागला आहे. महापालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या प्रदुषित पाण्याचा परिणाम आळंदीकरांवर दिसून येत आहे.