Pune – पुरंदर तालुक्यात दिवे गावातील भापकरमळा येथे दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाचा धारदार शास्त्राने खून (Murdered) करण्यात आला आहे. याबाबत सासवड पोलिसात (saswad Police) मयताच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. मयत अशोक भापकर याच्या पत्नीने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. घटनेनंतर घटनास्थळाला सासवड भोर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेट दिली आहे.

घटनाक्रम
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, मयत अशोक लक्ष्मण भापकर(वय ५६, रा. भापकर मळा, दिवे, ता. पुरंदर) यांना दारूचे व्यसन होते. आरोपी संजय बबन भापकर व किरण झेंडे (दोघे रा.दिवे ता.पुरंदर) हे तिघे काळेवाडीच्या ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. तिथे तिघेजण दारू पिले.

Advertisement

त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाले. नंतर ते सर्वजण आपआपल्या घरी गेले. आरोपी संजय बबन भापकर व किरण झेंडे यांच्या मनात झालेल्या वादाचा राग होता. घरी आल्यानंतर हे दोघे पुन्हा मयत अशोक लक्ष्मण भापकर यांच्या घरी गेले. अशोक भापकर याला घराबाहेर बोलावून त्या दोघांनी धारदार हत्याराने वार करून खून केला.

मयत अशोक भापकरच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरु केला. पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 302 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement