माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र ब-हाटे पोलिसांना शरण आल्यानंतर त्याचा साथीदार असलेला कथित पत्रकार देवेंद्र जैन याच्या मुसक्या पोलिसानी आवळल्या आहेत.

ब-हाटे व त्याच्या साथीदारांना मोक्का

माहिती अधिकाराचा गैरवापर करीत जमीन व्यवहारात अनेकांना गंडा घालून फरार झालेला ब-हाटे पोलिसांना प्रदीर्घ काळ चकवा देत होता. त्याच्या पत्नी व मुलाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या वकील साथीदाराला गजाआड केले.

त्यानंतर त्याच्यापुढे अन्य कोणताही पर्याय नसल्याने तो पोलिसांना शरण आला. त्यानंतर संबंधित गुन्ह्यातील सहभागी कथित पत्रकार देवेंद्र जैन याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. ब-हाटे याच्यासह १३ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

दीड वर्षे पोलिसांना गुंगारा

जमीन लाटणे, फसवणूक व धमकावणे अशा विविध गुन्ह्यासह मोक्का कारवाई केल्यानंतरही ब-हाटे गेली दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता.

बुधवारी तो शरण आल्यानंतर त्याला पोलिस कोठडीत देण्यात आली आहे. नुकतीच त्याची पत्नी संगीता, मुलगा मयुर यांच्याबरोबर पिंताबर धिवार, अॅड. सुनील मोरे यांना अटक केली होती.

पोलिसांनी त्याच्याविरोधात चारी बाजूने फास पोलिसांना शरण आला. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे दोन हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.

Advertisement