मुंबई : अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa Movie) चित्रपटानंतर त्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम त्याच्या ट्विटरवर दिसून आला असून, त्याने सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) यांना देखील मागे टाकले आहे.

अल्लू अर्जुनचे ट्विटर (Twitter)फॉलोअर्स ६.५ मिलियन एवढे असून तो नंबर एक ला आहे, तर सुपरस्टार रजनीकांत यांचे ६.१ मिलियन फॉलोअर्स (Followers) असून ते २ ऱ्या क्रमांकावर आहेत.

यात महत्वाची गोष्ट म्हणजे अल्लू अर्जुन ट्विटरवर कोणालाही फॉलो करत नसून रजनीकांत मुलगी ऐश्वर्या रजनीकांत, धनुष, अमिताभ बच्चनसहीत २४ लोकांना फॉलो करतात.

Advertisement

नुकताच अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) यांचा ‘ पुष्पा – द राइज’ (Pushpa) हा चित्रपट केवळ साऊथ इंडियातच नाहीतर देशाच्या सर्वच भागांमध्ये खूप प्रसिद्ध झाला आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत. तसेच सोशल मीडियावरही या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. सिनेमातील गाणी, डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सवर लोक रील्स बनवत आहे.

Advertisement