लोणी काळभोर येथील जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण विद्या मंदिराच्या १९८० सालच्या चौथीच्या व पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या १९८६ सालच्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला दोन डिजिटल वर्ग बांधून दिले.

डिजिटल वर्गाचे हस्तांतरण

या दोन्ही डिजिटल वर्गाचे हस्तांतरण हडपसर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, स्थानिक शिक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष सुभाष काळभोर, प्राचार्य एस. एम. गवळी, केंद्रप्रमुख रोहिदास मेमाणे, तत्कालीन शिक्षकवृंद आणि माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Advertisement

काय म्हणाले मोकाशी ?

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले, की जीवनातील प्रत्येक क्षेत्रात डिजिटलायझेन करण्याची गरज आहे. जेवढे डिजिटलायझेशन होणार, तेवढे काम चोख करावे लागणार आहे. कारण ते सगळ्यांपर्यंत पोहचणार आहे.

त्यातील चुका समाजाला शोधता येणार आहे, त्याची नोंद होणार आहे. त्यामुळे ते काम अभ्यासपूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे.

36 वर्षानंतर मित्रमैत्रिणी एकत्र

३५ वर्षांनंतर सर्व मित्र मैत्रिणी व शिक्षक भेटल्यामुळे सर्व आनंदीत झाले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील व शिक्षकांनी त्या वेळी शिकवताना आलेले कडू गोड अनुभव सांगितले.

Advertisement

त्यामुळे अधूनमधून हास्याची कारंजी उडत होती. या वेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांच्या तत्कालीन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

 

Advertisement