Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी या पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

पैसे कमवण्यासाठी आवश्यकता असते आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची. जेणेकरून कर्ज आपल्या डोईजड होऊ नये.

असे केल्याने व्यवसायात नेहमीच सकारात्मक प्रगती दिसून येते. जीवनामध्ये आर्थिक दृष्ट्या यशस्वी व्हायचे असेल तर आपण या काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

बर्‍याचदा लोक त्यांच्या कमाईपेक्षा जास्त खर्च करतात. असे करणे आपल्याला आर्थिक अडचणीत आणू शकते हे हास्यास्पद वाटेल, परंतु हे खरे आहे.

Advertisement

पैसे वाचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपण जे कमावत आहात त्यापेक्षा कमी खर्च करणे. तथापि, बहुतेक लोक समान चूक करतात आणि क्रेडिट कार्डवर खर्च करणे सुरू ठेवतात.

खर्चावर नियंत्रण ठेवायला शिका प्रत्येकाला वाटते की भविष्यात तो अधिक पैसा कमावेल आणि आधी केलेला खर्च त्यामध्ये ऍडजेस्ट होईल मात्र असे होताना दिसत नाही कारण ज्यावेळी व्यक्ती जास्त पैसा कमी होते त्यावेळी त्याचे खर्च देखील वाढत असतात त्यामुळे आवश्यक तेवढाच पैसा खर्च करावा

अचानक सरकारने टॅक्स वाढवला आणि तुम्हाला एक हजार रुपये महिन्याचा जास्त टॅक्स भरावा लागला, तर तुम्ही कशा ना कशा प्रकारे तो टॅक्स भरताल.

Advertisement

मात्र हीच वेळ जेव्हा पैसे वाचवण्याचे बाबतीत येते त्यावेळी मात्र वेगवेगळे कारणे शोधून पैसे वाचवणे शक्य नसल्याचे कारण पुढे करता असे करणे तुमच्यासाठी नुकसानदायी ठरू शकते.

अशावेळी तुम्ही एक ऑटोमॅटिक बँक ट्रान्सफर सेट करू शकता. ज्यामुळे जेव्हा केव्हा तुमचे पेमेंट होईल त्यातून काही वाटा तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये जाईल.

तुम्ही थोड्यावेळासाठी त्या पैशांना विसरून गेलेले अधिक फायदेशीर ठरेल, कारण काही वर्षांनंतर जेव्हा तुम्ही तुमचे सेविंग अकाउंट चेक कराल तेव्हा स्वतःवर खूष होताल.

Advertisement

जर तुम्हाला खरंच पैसे कमवायचे असतील आणि वाचवायचे असतील तर तुम्हाला अशा लोकांच्या सान्निध्यात राहिले पाहिजे जे आर्थिक दृष्ट्या अधिक जिम्मेदार असतील.

अशा लोकांकडून तुम्ही आर्थिक जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या हे शिकू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या नात्यातील एखादी व्यक्ती निवडू शकता. जेणेकरून त्याच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला होईल.

 

Advertisement

 

Leave a comment