मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकरमधील नेत्यांना सवाल केला आहे. तसेच मोदींच्या यूपी, बिहारसाठी मोदींच्या टार्गेटवर महाराष्ट्र सरकार असल्याचेही संजय राऊत म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत केलेल्या भाष्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारसाठी (Bihar) नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल केलेले वक्तव्य ऐकून वाईट वाटले.

कोरोना (Corona) या जागतिक महामारीचा उगम चीनमधून झाला, जागतिक आरोग्य संघटनेनंही मांडणी केलीय. त्या महामारीचे खापर महाराष्ट्रावर खापर फोडण्यात आले आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेने धारावी पॅटर्नचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र सरकार कसे काम आर्ट आहे याचे दाखले सुप्रीम कोर्टाने, हाय कोर्टाने इतरांना दिले होते.

डॉक्टर, नर्सेस यांनी काम केले होते. हौतात्म्य पत्करले त्यांचा आणि महाराष्ट्राचा हा अपमान आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी देखील बोलायला हवे असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलताना महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना सवालही केला आहे. सोनू सूद हे कोणाचे होते, सोनू सूदला राज्यपालांकडं कोण घेऊन जातं होते , असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे केला.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी बोलावे. राज्य सरकारमध्ये बसलेल्यांनी बोलावे, प्रत्येक वेळी बोलायला मी ठेका घेतलाय का? असा प्रश्नही राऊतांनी विचारला आहे.