पुणे – अमरनाथ (Amarnath) यात्रेदरम्यान अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीने (Amarnath cloudburst) अनेक भाविकांचा मृत्यू झाला. तर पुणे जिल्ह्यातील मंचर येथील अमरनाथ (Amarnath) सेवा संघाच्या वतीने अमरनाथ यात्रेसाठी गेलेले साडेतीनशे भाविक नुकतेच मंचर येथे आपल्या घरी सुरक्षितरित्या परतले आहे. दरम्यान, भाविक सुखरूप माघारी आल्यानंतर नातेवाइक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

अमरनाथ (Amarnath) येथे जोरदार पाऊस, निसरडा रस्ता, भरपूर अशी गर्दी झाली होती यामध्ये अनेक भाविक मृत्यू मुखी पडले होते. तर काहीजण बेपत्ता देखील झाले आहेत.

दरम्यान, अमरनाथ यात्रेसाठी (Amarnath) गेलेले साडेतीनशे भाविक आपल्या घरी सुखरूप आल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहेत. टीव्हीवरील बातम्या पाहून घरचे देखील घाबरून गेले होते.

ढगफुटीच्या घटनेदिवशी यात्रेचा दुसरा दिवस होता. त्यानंतर पाच दिवसांनी सर्वांचे महादेवांचे दर्शन होते. जलप्रलयाच्या भीतीने सर्वांच्या मनामध्ये शंका कुशंका होत्या.

मात्र, अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत धायबर यांनी सर्वांना नक्की दर्शनाचा लाभ होणार, असे सांगितले. दर्शनाच्या दिवशी खूप पाऊस आणि भरपूर अशी गर्दी झाली होती.

आणि अशा स्थितीत आयोजकांनी सर्वांना गुरूपौर्णिमेच्या दिवशी देवदर्शन घडवले. त्यामुळे एवढ्या लांब यात्रेसाठी गेलेल्या भाविकांमध्ये आनंद दिसून आला.

तर दुसरीकडे, याच अमरनाथ यात्रेसाठी आळंदीमधून गुरू कृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून 200 यात्रेकरू यात्रेला गेले होते. मात्र, यातील सात भाविक बेपत्ता झाले आहेत.

आळंदीतून 200 यात्रेकरु हे गुरुकृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून अमरनाथला गेलो होते. 25 जूनला हे भाविक अमरनाथच्या यात्रेसाठी पोहचले होते.