पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit shah) आज पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा पुणे दौरा हा दगडूशेठ गणपतीची (Dagdusheth Ganpati) पूजा करून चालू झाला आहे. त्यांनी देशासाठी गणपतीचरणी प्रार्थना केली आहे.
अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) जय्यत तयारी कारणात आली आहे. तसेच महापालिकेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तसेच तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचे भूमिपूजनही अमित शाह (Amit shah) यांच्या हस्ते होणार आहे.
आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची (Ram mandir) उभारणी निर्विघ्नपणे होवो. महाराष्ट्रासह भारत देश कोरोनामुक्त होवो, असे मागणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर मागितले आहे.
महापालिकेतील कार्यक्रमानंतर 3 वाजता अमित शहांच्या उपस्थितीत भाजप बूथ कार्यकर्ता संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अमित शहा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.