मुंबई – गणेशोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह (Amit Shah) मुंबई (mumbai) दौऱ्यावर आले आहेत. आजपासून अमित शाह मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. अमित शाह (Amit Shah) काल (रविवारी) रात्री मुंबईत दाखल झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी त्यांचे स्वागत केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान शाह सर्वप्रथम लालबागच्या राजाचे (lalbaugcha raja) दर्शन घेणार आहेत. सकाळी 10 वाजता ते लालबागचा राजा मंडळाला भेट देणार आहेत.

वर्ष 2017 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अमित शाह हे लालबागचा राजा गणेशोत्वाला भेट देण्यासाठी आले होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाह यांनी हा दौरा टाळला होता.

तसेच, गणरायाचे दर्शन झाल्यानंतर 11 वाजता त्यांची भाजपच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत आणि महत्त्वाच्या नेत्यांशी बैठकही होईल.

दरम्यान, या बैठकीदरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) अनुषंगाने महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजप कोअर कमिटीच्या या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय.

त्यानंतर अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या सार्वजनिक मंडळालाही ते भेट देणार आहेत.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपतीलाही अमित शाह दर्शनासाठी भेट देण्याची शक्यता आहे. अमित शाह यांचा मुंबई दौरा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.