पुणे – केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) येत्या रविवारी (20 नोव्हेंबर) पुणे शहराच्या (Shivsrushti) दौऱ्यावर आहेत. पुण्यातील आंबेगाव नऱ्हे या ठिकाणी साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे ते लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर उपस्थित राहणार आहेत.

रविवारी 20 नोव्हेंबरला सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते या शिवसृष्टीच्या (Shivsrushti) पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होईल.

शिवसृष्टीची (shivsrushti) संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान या संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

21 एकर परिसरात असलेल्या या ठिकाणी शिवप्रेमींना ऐतिहासिक थीम पार्कची सफर करता येणार आहे. शिवाजी महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग थ्रीडी तंत्रज्ञान वापरून साकारण्यात आले आहे.

याशिवाय महत्त्वाच्या किल्ल्यांचे व्हर्च्युअल रियालिटीद्वारे होणारे दर्शन, शिवकालीन शस्त्रागार, प्रतापगडावरील भवानी मातेचे मंदिर, अश्व शाळा, राजवाडा, नगरखाना या ठिकाणी पाहण्यासाठी मिळणार आहेत.

1974 हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे त्रिशताब्दी वर्ष होते. यानिमित्ताने महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आणि प्रदर्शनाचे आयोजन मुंबईच्या शिवाजी पार्क येथे करण्यात आले होते.

दरम्यान, पुण्यातील हा प्रकल्प आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे.

या प्रकल्पाचा खर्च साधारण 438 कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यात 60 कोटी रुपये उत्स्फुर्तपणे देणगीदारांकडून आतापर्यंत या प्रकल्पाला मिळाले आहेत. तसेच ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगातून काही निधी उपलब्ध झाला आहे.

मात्र, यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, 1 डिसेंबरपासून शिवसृष्टीचा हा पहिला टप्पा शिवप्रेमींना पाहण्यासाठी खुला होणार आहे.