मुंबई – गणेशोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह (Amit Shah) मुंबई (mumbai) दौऱ्यावर आले आहेत. आजपासून अमित शाह मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. अमित शाह (Amit Shah) काल (रविवारी) रात्री मुंबईत दाखल झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी त्यांचे स्वागत केलं.

दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान शाह सर्वप्रथम लालबागच्या राजाचे (lalbaugcha raja) दर्शन घेणार आहेत. सकाळी 10 वाजता त्यांनी लालबागचा राजा मंडळाला भेट दिली असून, काही महत्वाच्या बैठकांना सुद्धा हजेरी लावली.

यावेळी अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकातील भाजपा (BJP) आणि एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde group)यांची शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे.

गणरायाच्या दर्शनासाठी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शहा (Amit Shah) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघदूत बंगल्यावर भाजपाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत 150 नगरसेवकांचे टार्गेट भाजपाला टिले आहे. यावेळी त्यांनी मुंबईत भाजपाचेच वर्चस्व राहाय़ला हवे, असा सल्लाच सर्व भाजपा नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

तसेच, त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

“शिवसेनेने 2014 साली केवळ दोन जागांसाठी युती तोडली असा आरोपही अमित शाह (Amit Shah) यांनी केला आहे.

शिवसेना फोडण्यास भाजपा जबाबदार असल्याच्या आरोपांनाही यावेळी शाह (Amit Shah) यांनी उत्तर दिले आहे. स्वताच्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाल्याची टीका त्यांनी केली आहे.