मुंबई – गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर येत असलेले केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह (Amit Shah) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 5 सप्टेंबरला अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ही भेट होण्याची शक्यता आहे. शाह आणि राज यांच्या भेटीसाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे आणि भाजपा युतीच्या चर्चेची शक्यता आणखीच वाढली आहे. 

दरम्यान, मनसे-भाजपा युती झाल्यास ही युती शिवसेनेला मोठी अडचणीची ठरू शकते हे नक्की. नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे.

राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली असून, अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. वर्ष 2017 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अमित शाह हे लालबागचा राजा गणेशोत्वाला भेट देतात.

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाह यांनी हा दौरा टाळला होता. त्यानंतर यंदा अमित शाह यंदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

अमित शाह (Amit Shah) हे आपल्या मुंबई दौऱ्यात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis ) यांचीदेखील भेट घेणार आहेत.

शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.

अमित शाह आपल्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान ‘सागर’ बंगल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत.