पुणे – पुणे जिल्ह्यात आणि शहरात मनसे (mns) विद्यार्थी सेनेची संघटनात्मक बांधणीकरण्यासाठी मनसे नेते आणि विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे (amit thackeray) तीन दिवसांच्या पुणे जिल्हा (pune dist) दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राज्याच्या राजकरणात येऊन नवीन विचार करण्याऱ्या युवक युवतीची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मनातील भावना समजून घेणार आहेत, या शिवाय, मनसेच्या (mns) वेगवेगळया संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशीही ते संवाद साधणार आहेत. मनसे नेते बाबू वागसकर यांनी ही माहिती दिली.

मनसेकडून राज्यभरात पक्ष संघटनेच्या बांधणीवर भर दिला जात आहे. तर राज्यात मोठया प्रमाणात युवा पिढीला मनसेकडे आकर्षित होत आहे.

मात्र, त्यासाठी या युवक, युवतींचे राजकारणाबाबत असलेले मत जाणून घेऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे.

ही बाब लक्षात घेऊन मनसेकडून मनसे विद्यार्थी सेनेची जबाबदारी पक्षाचे युवा नेतृत्व असलेल्या अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.

त्यानुसार, 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत अमित ठाकरे पुणे जिल्ह्यातील युवक युवतींशी थेट संवाद साधणार आहेत. या तीन दिवसांच्या कालावधीत ते मनसे विद्यार्थी सेना, महिला सेना, मनसे पुणे शहर पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक,

तसेच मनसेच्या अंगिकृत संघटनांच्या प्रतिनिधीशीं संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यात पहिल्या दिवशी पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ तसेच जिह्यातील भोर, वेल्हा आणि

मुळशी मतदारसंघाच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करणार असून 13 ऑगस्ट रोजी पर्वती, हडपसर, पुरंदर, पिंपरी व मावळ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून 14 ऑगस्ट रोजी शिरूर,

चाकण, खेड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि युवक- युवतींशी संवाद साधणार असल्याचे वागसकर यांनी स्पष्ट केले.