पुणे – शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली असून, यामध्ये आता दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेत झालेल्या या अभूतपूर्व फुटीचे सावट यंदाच्या दसरा मेळाव्यावरदेखील (Shivsena Dasara Melava) दिसू आले आहे.

नुकतंच, शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन गटांच्या दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालं. मोठा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही बाजूंकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला दोन्ही मैदानांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले.

अनेक राजकीय मुद्द्यांवरून एकमेकांवर टोलेबाजीही करण्यात आली. दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींनी केलेल्या भाषणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, शिवाजी पार्कच्या शेजारी राहणाऱ्या राज ठाकरे आणि कुटुंबियांनी कुणाचं भाषण पाहिलं असेल असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावर राज यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी स्पष्टपणे उत्तर दिलंय.

कुणाचा मेळावा पाहिला? असा प्रश्न अमित ठाकरेंना (Amit Thackeray) विचारला असतात त्यांनी यावर उत्तर देत “मी कोणताही दसरा मेळावा पहिला नाही’, असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय.

आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नव्या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत अध्यक्ष अमित ठाकरे मराठवाडा महासंपर्क अभियान राबवत आहेत. त्यांची आता सुरुवात झाली आहे. आज ते सोलापुरात होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मराठवाडा दौऱ्यापूर्वी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचे सोलापुरात कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. सोलापुरातील सोन्या मारुती मंदिरात मारुतीची आरती करून अमित ठाकरे तुळजापूरला रवाना झालेत.