पुणे – पुणे जिल्ह्यात आणि शहरात मनसे (mns) विद्यार्थी सेनेची संघटनात्मक बांधणीकरण्यासाठी मनसे नेते आणि विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे (amit thackeray) तीन दिवसांच्या पुणे जिल्हा (pune dist) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राज्याच्या राजकरणात येऊन नवीन विचार करण्याऱ्या युवक युवतीची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मनातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या शिवाय, मनसेच्या (mns) वेगवेगळया संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशीही ते संवाद देखील साधत आहेत.

सध्या मनसेकडून राज्यभरात पक्ष संघटनेच्या बांधणीवर भर दिला जात आहे. तर राज्यात मोठया प्रमाणात युवा पिढीला मनसेकडे आकर्षित होत आहे.

दरम्यान, नुकतंच अमित ठाकरे (amit thackeray) यांचा पुण्यातील शिरूर लोकसभा दौरा पार पडला असून, या दौऱ्यातील त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या दौऱ्यादरम्यान त्यांची भोजनाची व्यवस्था जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या घरी करण्यात आली होती. मात्र जेवणासाठी उशिर झाल्याने अमित ठाकरे यांचा साधेपणा पुन्हा एकदा पहायला मिळाला.

यावेळी घरात जेवणाच्या पंगतीला बसलेले अमित ठाकरे यांना भुकेचे भान राहिलं नाही, त्यांनी चक्क स्वयंपाक घर गाठलं.

“हे माझच घर आहे , मी हाताने घेतो म्हणत आवडत्या भाज्या घेतल्या, काही लागला तर मी घेतो’, अस बोलत पंगतीत बसले. त्यांचा हा साधे पणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

असून जेवणाची वेळ टळल्याने आणि जोराची भूक लागल्याने अमित ठाकरेंनी हातांनी घेवून दुपारची न्याहारी संध्याकाळी केली आणि मराठमोळ्या पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.

विद्यार्थ्यांच्यासोबत संवाद…!

दरम्यान, या दौऱ्यात अमित ठाकरे (amit thackeray) यांनी महविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यासोबत संवाद साधला. विद्यार्थिनी सोबत वैयक्तिक चर्चा करून राजकारणात विद्यार्थिनीची गरज असून तुम्ही प्रत्येकाने राजकारणात आले पाहिजे,

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी असून सर्वांसाठी दार खुली केली आहेत.आणि तुम्ही सुद्धा या संधीचा लाभ घेतला पाहिजे असं अमित ठाकरे (amit thackeray) यावेळी म्हणाले.