‘मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांची आज भेट घेत आर्थिक मदत केली. ठाण्याचे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावतीनं दोन लाख रुपयांचा चेक ठाकरे यांनी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला दिला. त्याचबरोबर पक्ष नेहमी पाठशी राहील, असे आश्वासन ठाकरे यांनी दिलं.

सरकार झोपलं आहे का ?

‘महाराष्ट्र सरकारमधील दोन लाख पद रिक्त आहे. हे सरकार झोपले आहे का? असं काही पाऊल उचलल्यानंतर सरकार जागे होणार आहे का, असा सवाल करीत सरकारवर ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

‘एमपीएसीसी’ची परीक्षा देऊनही हातात नोकरी नाही, आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही आपण कुटुंबीयांना मदत करू शकत नसल्यामुळे स्वप्नील लोणकरनं त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केली.

Advertisement

संतापाची लाट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्यामुळं एका २४ वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली.

स्वप्नील सुनील लोणकर या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्नील याच्या आत्महत्येनं सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.

मुलाच्या बलिदानानंतर जाग

‘आशा भेटी देऊन आमचा प्रश्न सुटणार नाही. आयुष्यभर आम्हाला रडतखडत जगावं लागेल. आम्हाला भेटण्यापेक्ष भरती करा आणि विद्यार्थ्यांना नोकरी द्या.

Advertisement

आम्हाला आमचा मुलाला नोकरीला लागली असं वाटेल. आमच्या मुलांचं बलिदान गेलं. त्यामुळं जाग तरी आली’ अशी प्रतिक्रिया स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांनी दिली.

 

Advertisement