पुणे : माजी खासदार (MP) शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना बैलगाडा शर्यतींवरून आव्हान केले होते. मात्र कोल्हे यांनी अखेर ते आव्हान स्वीकारले आहे.

बैलगाडा शर्यतींमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या, असे आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना आव्हान केले होते. त्यांच्या या बोलण्याला अमोल कोल्हे यांनीही सडेतोड उत्तर दिले होते.

त्यावेळी कोल्हे म्हणाले होते की, ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो,” असे बोलत आज त्यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.

Advertisement

पाटील यांनी ‘खासदार अमोल कोल्हे यांना माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा, असे आव्हान दिले होते.

दरम्यान पुण्यातील (Pune) निमगाव दावडी येथील घाटातील बारीत खासदार कोल्हे घोडीवर बसणार आहेत. निमगाव दावडीचे बैलगाडा मालक आजच्या दिवशी या मानाच्या घाटात स्वखुशीने आपापल्या बैलांची जोडी उतरवत असतात. तिथेच आज खासदार अमोल कोल्हे घोडीवर बसून, बैलजोडी समोर बारी मारणार आहेत.

डिसेंबर २०२१च्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विविध अटी व शर्ती घालत बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली होती. तसेच याआधीही या शर्यतींवरून कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यात अनेक वादविवाद झाले आहेत.

Advertisement