पुणे – एकीकडे गुजरात (Gujrat) राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आणि दुसरीकडे पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. दरम्यान आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) स्टार प्रचारकांची यादी (star campaigner) जाहीर करण्यात आली असून, या यादीतून एक महत्वाचं नाव काढून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून ओळख आहे. मात्र गुजरात निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या स्टार प्रचारकांच्या (star campaigner) यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, मात्र अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचं नाव नसल्याने आता चर्चांना चांगलंच उधाण आल्याचं पहायला मिळत आहे.

गुजरात निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, सोनिया दुहान यांच्यासह 31 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मात्र 2019 मध्ये आपल्या भाषणाने ज्यांनी स्वतःची नव्याने ओळख निर्माण केली, जनतेच्या मनावर राज्य केले, राष्ट्रवादीला नवा चेहरा दिला, त्या डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव मात्र या यादीत नसल्याचे समोर आले आहे. ते पुन्हा एकदा नाराज असल्याच्या चर्चांना खतपाणी मिळाले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणाने वेगळी ओळख निर्माण केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घराघरात पोहोचवण्याचं काम त्यांनी आपल्या भाषणातून केलं होतं. मात्र 2024 च्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचं नाव वगळण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन (Amol Kolhe) पार पडले. या अधिवेशनातही अमोल कोल्हे गैरहजर होते. त्यावेळी त्यांनी आजारी असल्याचे कारण दिले होते.

आता पुन्हा एकदा ते नाराज असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे नावच स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. शिवाय याबाबत अमोल कोल्हे यांनी अद्यापही स्पष्टीकरण दिलेलं नाही.