मुंबई – भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या ट्विटमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या राज्यात ईडी अॅक्टिव्ह आहे. विरोधीपक्षातील नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय (sanjay raut) राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर नेक्स्ट कोण?

याचं उत्तर भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी भविष्यवाणी करणाऱ्या ट्विटमधून दिलंय. “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख (Anil Deshmukh), नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे.

लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!’ या आशयाचे ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

दरम्यान, आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या या ट्विटला राष्ट्रवादी कडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले…

“ईडीच्या दारात बसून त्यांनी ही माहिती मिळवली आहे का? मोहित कंबोजचीही चौकशी झाली पाहिजे. ईडी कोणाच्या घरी धाड टाकेल त्यासंबंधी ट्वीट करत असेल, पत्रकार परिषद घेणार असतील तर हे संशयास्पद आहे.

मोहित कंबोज हा कोणाचा कार्यकर्ता, माणूस, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे सर्वांना माहिती आहे.” अशी टीका अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे.