मुंबई : कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यात चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. अमृता फडणवीसांनीही (Amruta Fadanvis) बंडातात्या कराडकर यांच्यावर टीका केली आहे.

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) दारू पिऊन नाचतात आणि भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) याही दारू पितात अशा प्रकारचे आक्षेपार्ह विधान केले होते.

अनेक पक्षातील नेत्यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच कराडकरांनी माफी मागायला हवी असेही अनेक पक्षातल्या नेत्यांनी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

Advertisement

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली असली तरी हे प्रकरण काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. अनेक स्तरातून बंडातात्या कराडकर यांच्यावर टीका होत आहे.

भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही बंडातात्या कराडकर यांच्यावर टीका केली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही टीकेची झोड उठल्याचे दिसत आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, मला वाटते स्त्रियांनी आपल्या देशात अधीच खूप त्रास सहन केला आहे. त्यामुळे स्त्रियांवर टिप्पणी करणे आणि त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलणे चुकीचे आहे.

Advertisement

त्यापासून दूर राहिले पाहिजे. आपल्या देशात नेहमी हेच होते. कोणी काही बोलले की त्यावर आपण आंदोलन करतो. पण या गोष्टी मानसिकतेशी संबंधित आहे. आपणच ठरवले पाहिजे काय बोलावे आणि काय बोलू नये.

स्त्रियांच्यांवर अत्याचार होतात तेव्हाच आपण बोलतो किंवा कारवाई करतो. पण आता आपल्याला आपल्या मानसिकतेत रिव्हॉल्यूशनरी चेंज आणावा लागेल, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर टीका केली आहे.

पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा. मी सामान्य नागरिक म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते.

Advertisement

त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही.

मुंबईत (Mumbai) अनेक इश्यू आहेत. मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच. तुम्ही या मुद्द्यांवर लक्ष दिले पाहिजे.

ती मुंबईची गरज आहे, तसेच नॉटी वगैरे नावे लोकांनीच दिली आहेत. त्याचा अर्थ शब्दश: घेऊ नका. त्याचा भावार्थ समजून घ्या, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

Advertisement