पुणे – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. नुकतंच संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. एका महिला पत्रकाराने (Women Journalist) विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी ‘तू आधी कुंकू लाव, मग मी तुझाशी बोलतो’ असे वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या बुरसटलेल्या मनोवृत्तीच्या वक्तव्यावर राज्यभरातून प्रचंड टीका होत असून, अश्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आल्या असताना त्यांनी माध्यमांंशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “माझ्या मनात भिडे गुरुजींबद्दल आदर आहे. ते हिंदुत्त्वाचे स्तंभ आहेत.

पण मला असं वाटतं, महिलांनी कसं जगावं हे कोणी सांगू नये, तिची एक जीवनशैली असते, त्याप्रकारे ती जीवन जगत असते.”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी दिली आहे.

तर, दुसरीकडे काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही फेसबुकवर एक पोस्ट टाकून संभाजी भिडे यांना चांगलेच फटकारले.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या फेसबुक पेजवर हेरंब कुलकर्णी यांची ‘तू आणि मी’ ही कविता शेअर केली आहे. या कवितेमधून स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या मनोवृत्तीवर निशाणा साधण्यात आला आहे.

संभाजी भिंडे काय म्हणाले होते…

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,”

यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं आहे.