पुणे – ‘मंगळसूत्र गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला की काय असं वाटतं’ असं विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केलं आहे. नुकतंच अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात आपली उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या कार्यक्रमाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. मराठी अभिनेता सुबोध भावेनं कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात ही महिलांची राखीव बस अमृता फडणवीस यांच्यासाठी थांबवली आहे.

सुबोध भावे आणि महिला मंडळ हे या भागात अमृता फडणवीसांचा आतापर्यंतचा प्रवास उलगडणार आहेत आणि त्यांना पेचात टाकणारे काही प्रश्नदेखील विचारणार आहेत.

Advertisement

या कार्यक्रमातील महिला मंडळाने त्यांना खूप गमतीशीर प्रश्न विचारले आणि अमृता यांनी तेवढ्याच खुमासदार पद्धतीने त्यांची उत्तरं दिली आहेत.

सध्या या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रोमोत आपण पाहू शकता की, कार्यक्रमातील महिला मंडळाने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मोकळेपणाने आणि खूप मजेदार उत्तर दिली आहेत.

Advertisement

यात महिला मंडळाने अमृता फडणवीस यांना गळ्यातील मंगळसूत्रबद्दल प्रश्न विचारला, यावर अमृता फडणवीस यांनी देखील फारच खुमासदारपणे उत्तर दिलं असल्याचं पहायला मिळत आहे.

तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर सासूबाई ओरडत नाहीत का? असा प्रश्न अमृता (Amruta Fadnavis) यांना विचारला होता.

त्यावर त्या म्हणाल्या, ‘मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतिक आहे. ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला की काय असं वाटतं, त्यामुळे मी मंगळसूत्र हातात घालते. त्यामुळे देवेंद्रजींनी सतत माझा हात धरला आहे”. असं मला वाटतं’.

Advertisement

सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या या उत्तराने धुमाकूळ घातला असल्याचे पाहायला मिळत आहे.