file photo

पुणे : विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शिवसेनेबरोबर जाणार नसल्याचे संकेत दिले असताना पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप युती होऊ शकते, आता शिवसेनेनं हा निर्णय घ्यायचा आहे, असं म्हटले आहे.

महापालिकेत शिवसेनेला बरोबर घेणार

पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत. महापालिकेत शिवसेना भाजप युती होऊ शकते.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आम्ही शिवसेनेला प्राधान्य देऊ, असंही बापट म्हणाले.

Advertisement

बापट नेमकं काय म्हणाले?

भाजप-सेनेची युती ही हिंदुत्वावर होती. ती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. कारण मला असं वाटतं, की ही सर्वांच्या मनातील बोलकी प्रतिक्रिया आहे. प्रताप सरनाईक सर्वांच्या मनातील बोलले आहेत. भविष्यात युती होऊ शकते.

राजकीय जीवनात अशा गोष्टी घडत असतात. भाजपने याआधीही सांगितलं होतं, तुमची आमची नैसर्गिक युती आहे; पण मधल्या काळात कृत्रिम लोकांनी ती तोडली. भविष्यात अशी युती झाली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल, असं ते म्हणाले.

दादांचे कार्यकर्ते ऐकत नाही, हे पहिल्यांदाच ऐकतो

पुण्यात दोन दिवसांपूर्वी सकाळच्या बैठकीत अजित पवार म्हणाले होते, की गर्दी जमली तर १५ दिवस क्वारंटाईन करेन, आणि नंतर म्हणतात की कार्यकर्ते माझं ऐकत नाहीत.

Advertisement

दादा शरद पवारांचं ऐकत नाहीत हे मला माहित होतं; मात्र दादांचं कार्यकर्ते ऐकत नाहीत हे मी पहिल्यांदाच ऐकतोय, असा टोला बापट यांनी लगावला.

राष्ट्रवादीला पक्ष मानत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसला हा मी पक्ष मानत नाही. तो एक पश्चिम महाराष्ट्रातील गट आहे. पुणे महापालिकेत दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. महापालिकेत भाजपच सत्तेत येणार, असं म्हणत त्यांनी पवारांना डिवचलं.

Advertisement