पुणे : हायप्रोफाईल (High profile) कॉल गर्लसोबत (Call girl) सेक्स (Sex) करण्याच्या नावाखाली तरुणांची आर्थिक फसवणूक करण्याची घटना पुण्यात (Pune) घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी (Cyber police) एका महिलेला अटक केली आहे.

या प्रकरणातील आरोपी दिपाली कैलास शिंदे (वय २६, रा़ नेताजीनगर, वानवडी) या महिलेने कॉल गर्लचे आमिष दाखवून ७६ वर्षाच्या व्यावसायिकाची ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार या महिलेने मला श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीजसोबत मिटिंग करुन देण्यासाठी सिक्युरिटी फी भरावी लागेल, असे सांगून सुरुवातीला २ लाख रुपये ट्रान्सफर (Transfer) करण्यास भाग पाडले.

Advertisement

त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेने तिच्या बँक खात्यावर (Bank Account) पैसे पाठविण्यास सांगून एकूण ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी सायबर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीने गुन्ह्यात वापरलेले बँक अकाऊंटची माहिती व इतर माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले आहे. त्यामध्ये आरोपी ही वानवडी येथे राहत असल्याची माहिती मिळाली.

व पोलिसांनी शोध घेऊन या महिलेला अटक केली आहे. शिंदे ही उच्चभ्रु महिलांना सेक्ससाठी पुरविणार असे लोकांना फोनद्वारे सांगण्याचे काम करीत होती व गुन्ह्यामधील रक्कम घेण्यासाठी स्वत:च्या बँक अकाऊंटचा वापर केला आहे.

Advertisement

या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी़. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगिता माळी, उपनिरीक्षक अमोल वाघमारे, पोलीस अंमलदार राहुल हंडाळ, अंकिता राघो, शुभांगी मालुसरे व निलेश लांडगे यांनी ही कारवाई केली आहे.