file photo

मुंबई : मनसे राजकारणाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने आणि निवडणुकीत धोरणात्मक निर्णयात सुस्पष्टता नसल्याने मनसेची राजकीय ताकद कमी होत आहे.

त्यामुळे मनसेला सोडून जाणा-यांची संख्या वाढते आहे. आता मनसेचा आणखी एक मोहरा शिवसेनेच्या गळाला लागला आहे.

मनसेला मोठा धक्का

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

Advertisement

हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात मनसेनेही दंड थोपटले आहेत; मात्र त्याआधीच या पक्षांतराने मनसेची काळजी वाढवलीय.

काय म्हणाले शिरोडकर?

आदित्य शिरोडकर म्हणाले, “मी माझी राजकीय कारकीर्द 2000 मध्ये सुरू केली. माझी कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी या पदावर निवड झाली होती. 2005 मध्ये मी रुपारेल कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलो.

त्यानंतर शिव उद्योग सेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी सक्रिय झालो आणि लोकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यास मदत केली. 9 मार्च 2006 मध्ये मनसे पक्षाची स्थापना झाली.

Advertisement

मला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली. तेव्हा मी राज्यभरातील विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र दौरा करून विद्यार्थ्यांची एकजूट करण्यास सुरुवात केली.”