Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

आणि पर्यटनस्थळं झाली रिकामी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशाची पोलिस व लोणावळा नगरपालिका प्रशासनासह सबंधित ग्रामपंचायतींनी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याने लोणावळा व मावळातील सर्वच प्रमुख पर्यटनस्थळे निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळालं.

गर्दीला रोखण्यासाठी आदेश

कोरोना संदर्भातील निर्बंध असतानाही लोणावळा, खंडाळा आणि मावळातील पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होत होती.

या गर्दीमुळे वाढणारा कोरोनाचा धोका लक्षात घेत पवार यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हाधिका-यांनी लोणावळा व मावळातील पर्यटनस्थळे व परिसरात जमावबंदीचे आदेश दिले.

Advertisement

पोलिसांनी पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास मज्जाव केल्याने माघारी फिरलेल्या पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी केली होती. पर्यटकांच्या वाहनांमुळे जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळ्यात वाहतूक कोंडी झाली.

पर्यटकांना पाठवले परत

पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या भुशी धरण व टायगर, लायन्स, शिवलिंग पॉईंट्सकडे जाणाऱ्या मार्गावर लोणावळा धरणाजवळील नौसेना बाग येथे चेकनाका उभारण्यात आला आहे.

या परिसरात शहर पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणाहून वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांना पुन्हा माघारी पाठवण्यात येत होते.

Advertisement

पर्यटकांचा मोठा हिरमोड

एरव्ही दरदिवशी विशेषतः पावसाळ्यातील वीकएंडला हजारो पर्यटकांच्या संख्येने गजबजणारे भुशी व लोणावळा डॅम, टायगर, लायन्स, शिवलिंग पॉईंटस या मुख्य पर्यटन स्थळांसह या परिसरातील पर्यटन स्थळे अक्षरशः निर्मनुष्य झाली होती. दूरवरून वाहनांनी आलेल्या पर्यटकांना माघारी फिरावे लागल्याने पर्यटकांचा मोठा हिरमोड झाला.

ठिकठिकाणी नाकाबंदी

लोणावळा-खंडाळयानंतर पर्यटकांचे मावळातील आकर्षणाचे ठिकाण असलेल्या कार्ला लेणी, एकविरा देवी मंदिर, भाजे लेणी, भाजे लेणी धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग व राजमाची गड-किल्ले, पवनाधरण व परिसरातील दुधीवरे खिंड, प्रती पंढरपूर दुधीवरे या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर ग्रामीण पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.

 

Advertisement
Leave a comment