मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटी रुपायंच्या खंडणीच्या आरोपात आता सीबीआय आणि ईडीने चाैकशीचा फास चांगलाच आवळला असून, देशमुख यांच्या मुलांच्या गुंतवणुकीचीही चाैकशई होणार आहे.

कोलकात्त्यातील कंपनीत मोठी गुंतवणूक

परमबीर यांनी केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने देशमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याशिवाय याप्रकरणी ईडीची देखील चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील सर्व घडामोडी आता वेगाने घडताना दिसत आहेत.

या घडामोडी सुरू असतानाच आता देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर देशमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आर्थिक व्यवहार तपासायला सुरुवात केली आहे.

यादरम्यान देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांनी कोलकाता येथील एका कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे

चार कंपन्या घेतल्या विकत

सलील देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांनी गुंतवणूक केलेल्या एका कंपनीचं नाव समोर आलं आहे. या कंपनीचं नाव झोडियाक डेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड असं आहे.

दोघा भावंडांनी मार्च 2019 मध्ये झोडियाक डेलकॉम ही कंपनी आणि तिच्या उपकंपन्या विकत घेतल्या. यामध्ये जेम्स प्रायव्हेट लिमिटेड, काँक्रीट रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, अटलांटिक व्हिसा प्रायव्हेट लि