बारमालकांकडून अनिल देशमुख यांच्यासाठी खंडणी वसूल केल्याच्या आरोपावरून
देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.

दहा तास चाैकशी

पालांडे आणि शिंदे यांची दहा तास चौकशी केल्यानंतर त्यांना मध्यरात्रीच अटक करण्यात आली. यानंतर देशमुख यांना तात्काळ चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं; मात्र देशमुख हे चौकशीसाठी हजर राहीले नाहीत.

त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितली. देशमुख हे चौकशीला हजर न झाल्याने आता ईडीचे अधिकारी त्यांना दुसरं समन्स पाठवण्याच्या तयारीत आहेत. येत्या एक-दोन दिवसात हे समन्स पाठवलं जाईल आणि पुढच्या आठवड्यात त्यांना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

उशिरापर्यंत बार चालू ठेवण्यासाठी खंडणी

संजीव पालांडे यांची बाजू वकील शेखर जगताप तर कुंदन शिंदे यांची बाजू वकील अभिजीत सावंत आणि मेहूल ठक्कर यांनी मांडली, तर ईडीच्यावतीने सुनील गोंसावलीस यांनी युक्तिवाद केला.
“सचिन वाझेने डिसेंबर महिन्यात 40 लाख रुपये गुडलक म्हणून संजीव पालांडेला दिले होते.

वाझे याने मुंबईतून 4 कोटी 80 लाख रुपये वसुली करून गोळा केले होते. मुंबईतील 60 बार मालकांना रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवण्यासाठी हे पैसे गोळा करण्यात आले होते. जया शेट्टी आणि महेश शेट्टी या बार मालकांनी त्यांच्या जबाबात तसं म्हटलं आहे.

वाझेने त्याच्या जबाबात याचा उल्लेख केला आहे. वाझेला चांगली पोस्टिंग याच करता दिली होती का, याची चौकशी करायची आहे”, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी दिली.

Advertisement