पुणे : राज्य सरकारकडून (State Goverments) किराणा दुकानात (Grocery store) वाईन (Wine) विक्रीचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य शासनाकडून परवानगी पण देण्यात आली आहे. सरकारच्या याच निर्णयाविरोधात आण्णा हजारे (Anna Hazare) उपोषणाला बसणार आहेत.

जेष्ठ समाजसेवक (Senior social worker) अण्णा हजारे राज्य शासनाच्या चुकीच्या निर्णयाविरोधात १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला (Fasting) बसणार आहेत. यासंबंधीचे पत्र (Letter) आण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) लिहले आहे.

अनेक स्थरातून राज्य शासनाच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. आण्णा हजारे यांनी महाराष्ट्रासाठी (Maharashtra) हा निर्णय (Decision) अतिशय दुर्दैवी असल्याचे पत्रात म्हंटले आहे.

Advertisement

आण्णा हजारे यांनी पत्रात म्हंटले आहे की, या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतात. महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटते.

युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्वचर्यकारक आहे. असे आण्णा हजारे यांनी पत्रात म्हंटले आहे.

Advertisement