पुणे : पुण्यातील (Pune) घोटवडे भागात गोडांबेवाडी (Godambewadi) गावातील महिलेने चुलत भावासोबत संबंध ठेवले होते. यातून जन्मलेल्या ६ दिवसाच्या बाळाला (Baby’s) बापाने पुणे (Pune) जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) फेकून दिले आहे.

या महिलेने चुलत भावाशी शरीर संबंधातून या बाळाला जन्म दिला होता. मात्र नातेवाईकांच्या दबावामुळे पुणे (Pune) जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) बाळाला फेकुन देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

यामध्ये बाळाच्या बापानेच पाच फेब्रुवारीला या सहा दिवसांच्या बाळाला ताम्हीणी घाटात फेकुन दिले आहे. या घटनेचा तपास चालू असून फेकुन देण्यात आलेल्या बाळाचा मृतदेह पोलीस (Police) आणि ट्रेकर्सच्या (Trekkers) सहाय्याने शोध घेण्याचे काम चालू आहे.

Advertisement

या बाळाची आई मंगल पवार ही पुण्यातील घोटवडे भागात गोडांबेवाडी गावात मजुरी करते. तिच्या पतीचे निधन झाले असुन पहिल्या पती पासून तिला एक मुलगी आहे.

मात्र गोडांबेवाडीत मंगलच्या सोबतच मजुरी करणाऱ्या सचिन चव्हाण या चुलत भावाशी तिचे शारीरिक संबंध आले होते. या संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला तिच्या कुटुंबाचा सहन झाले नाही.

चव्हाण कुटुंब हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. पाच तारखेला रत्नागिरी जिल्ह्यातील गावाला जायचे आहे असे सांगून मंगल पवारला कारमधे घेऊन तिचे चुलत भाऊ संजय चव्हाण, नितिन चव्हाण, अजय चव्हाण आणि सचिन चव्हाण हे निघाले होते.

Advertisement

मात्र ताम्हीणी घाटातील दरी पुलाजवळ गाडी आली असता ज्याच्यापासून बाळ झाले होते त्या सचिन चव्हाणने मंगल पवारच्या हातातून बाळ खेचून घेतले आणि ते दरीत फेकुन दिले.

यावेळेस मंगल पवार आणि त्यांच्या मुलीला कारमधे लॉक करुन ठेवले होते. मंगल पवारने घोटवड्याला परत आल्यानंतर याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरु करण्यात आला आहे.

Advertisement