पुणे : येथील ६५ वर्षीय अनुसया पाटोळे (Anusaya Patole) या महिलेची सावकार (Moneylender) दिलीप वाघमारे (Dilip Waghmare) याच्याकडून ८ लाख रुपये कर्ज घेतल्याप्रकरणी पिळवणूक होत आहे. या सावकाराने पैसे वसुलीसाठी महिलेला मंदिराबाहेर भीक मागायला लावली आहे.

याप्रकरणी सावकार माझी फसवणूक करून पैश्याची परतफेड केली असताना सुद्धा अजून पैसे बाकी आहेत असे सांगत आहे. व यासाठी मला मंदिराबाहेर (temple) भीक मागावी लागत आहे.असे या महिलेने सांगितले आहे.

तसेच पीडित महिलेकडून कर्जाचे व्याज घेण्यासाठी सावकाराने महिलेकडील एटीएम कार्ड, (ATM) पासबुकही (Passbook) काढून घेतले होते. सदर घटनेचा तपास पोलिसांनी (Police) केल्यानंतर त्यांना ही माहिती समोर आली आहे. त्यांनतर पोलिसांनी आरोपी वाघमारेला अटक केली आहे.

Advertisement

ही वृद्ध महिला पुणे (Pune) महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. त्यांनी आरोपी दिलीप वाघमारे यांच्याकडून ८ लाख रुपये खासगी सावकारपद्धातीने कर्जाऊ घेतले होते. त्यानंतर घेतलेल्या कर्जाचे २०१७ पासून नियमित व्याज त्या भरत होत्या.

मात्र तरीही अद्याप तुझे कर्ज फिटले नाही. असे सांगत आरोपी वृद्ध महिलेला धमकी देत त्यांच्याकडून पैसे घेत राहिला. इतकेच नव्हे तर पीडितेच्या खात्यात असलेले आठ लाख रुपयांची रक्कमही आरोपीने घेतली आहे.

त्यानंतर पीडितेकडून सावकाराने बँकेचे पासबुक, एटीएमही काढून घेतले. स्वतः जवळील सर्व रक्कम संपल्याने दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाल्याने पीडित महिलेने मंदिराच्या बाहेर भीक मागण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement