ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

‘विकास पुरुष’ ला ‘लय भारी’ ने उत्तर!

पुणे शहर भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा ‘विकासपुरुष’ असा उल्लेख असलेले फ्लेक्स अनेक ठिकाणी लावले आहे.

त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून अजितदादांचे ‘कारभारी लयभारी’ असा उल्लेख असलेले फ्लेक्स सगळीकडे लावण्यात आले आहे.

बॅनरबाजीतून एकमेकांना आव्हान

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री नेते अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी येत आहे.

हा योगायोग असला, तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत; मात्र ऐकतील ते कार्यकर्ते कसे? पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी करत एकमेकांना आव्हान दिले आहे.

नेत्यांचे आदेश धाब्यावर

आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या उंबरठ्यावर पुण्यात फडणवीस आणि पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीकडून जोरदार ‘पोस्टरबाजी’ द्वारे शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना वाढदिवस साध्यापणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे; मात्र त्या आवाहनाला फार गांभीर्याने न घेता कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी जोरदार पोस्टरबाजी केली आहे.

‘पोस्टर युद्ध’ भडकणार

या निमित्ताने या शहरात झळकत असलेल्या फ्लेक्सचा चर्चेचा विषय ठरत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर प्रमुख राजकीय पक्षांमधील ‘पोस्टर युद्ध’ आणखी वाढत जाणार असल्याची शक्यता आहे.

 

You might also like
2 li