पुणे : एकीकडे ओमिक्रॉनची (Omicron) रुग्णसंख्या (Patients) वाढत असतानाच एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. पुणे जिल्ह्यात (Pune District) पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण (Covid Patients) वाढताना दिसत आहेत.

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता जिल्हा (District Administration) आणि राज्य प्रशासनाने (State Administration) नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचे पालन करणेबाबत नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या तब्बल २ हजार ५३ इतकी आहे. या सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महानगरपालिका (Muncipal Corporation) आणि शहरातील व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Advertisement

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व रुग्णालये (Hospitals) सज्ज करण्यात आली आहेत. तसेच कोरोना च्या लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. कोरोना चाचण्यांमध्ये (Covid Tests) देखील वाढ करण्यात आली आहे.

शहरात सद्यस्थितीला १८५ लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) लसीकरण सुरु आहे. शहरात मंगळवार १७१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच ९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) ​दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आज एक जणाचा मृत्यू झाला आहे़. सध्या विविध रुग्णालयांत 85 गंभीर रुग्णांवर तर ५७ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.

Advertisement

शहरात आतापर्यंत ३८ लाख ४५ हजार ४०९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यांतील ५ लाख ९ हजार २७६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यांपैकी ४ लाख ९९ हजार ९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.आतापर्यंत शहरात ९ हजार ११५ जणांचा मृत्यू झाला आहे