पुणे : एकीकडे ओमिक्रॉनचे (Omicron) संकट गढद होत असताना कोरोना रुग्णसंख्येमध्येही (Corona patient) लक्षणीय वाढ होत आहे. पुणे (Pune) शहरात ओमिक्रॉनचे आतापर्यंत ७ रुग्ण आढळून आले आहे.

याच पार्शवभूमीवर प्रशासनाकडून (Administration) रात्री ९ ते सकाळी ५ जमावबंदी लावण्यात आली आहे. शहरात कोरोना चाचण्या (Corona tests) वाढवण्यात आल्या आहेत. ६ ते ७ हजार चाचण्या दिवसात केल्या जात आहेत.

गेली काही दिवस कोरोना रुग्णसंख्या (Number of patients) कमी होत असल्याचे चित्र होते. मात्र आता तसे दिसत नाही. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. १ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत शहरात २१९४ रुग्ण सापडले आहेत.

Advertisement

याच कालावधीत पुणे शहरात १ लाख ४१ हजार ५५१ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहराचा रुग्ण सापडण्याचा पॉझिटिव्हिटी दर (Positivity rate) ​१.५४ डिसेंबर महिन्यात नोंदवला गेला आहे.

वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि मास्कचा वापर करावा. प्रशासनाने केलेल्या नियमावलीचे पालन करावे

Advertisement