ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

महामंडळावर लवकरच नियुक्त्या

नवीदिल्लीः गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या महामंडळ नियुक्त्यांना आता मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तीनही पक्षांत आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव होता.

आमदार आणि कार्यकर्त्यांत नाराजी होती. ती दूर करण्यासाठी आता विविध महामंडळे आणि विश्वस्त संस्थांच्या पदाधिका-यांची निवड करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

तीनही पक्षांकडून नावाचा शोध सुरू

राज्य सरकारमधील ५० पेक्षा जास्त बोर्ड आणि महामंडळाच्या नियुक्त्यांसाठीबो या पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी बैठकांचे सत्रही सुरू आहे.

या तीनही पक्षांचे मंत्री असलेल्या सहा सदस्यीय समन्वय समितीने या बोर्डावरील आणि मंडळावरील संचालक आणि अध्यक्ष यांच्या नावाला अंतिम स्वरूप देण्यासाठी एक बैठक घेतली.

नावांची यादी मुख्यमंत्र्यांकडे कोणत्याही क्षणी

या समन्वय समितीत ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे (शिवसेना), अजित पवार, जयंत पाटील (राष्ट्रवादी), अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात (काँग्रेस) यांचा समावेश असून, आतापर्यंत त्यांनी २५ वेळा बैठक घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणत्याही क्षणी ही समिती नावांची यादी सोपवू शकते. यामुळे राज्यातील राजकीय अस्थिरता कमी होऊ शकते.

सरकारला स्थैर्य

भाजप सभागृहात आणि बाहेरही आक्रमक आहे. मात्र, अद्याप ही आघाडी तोडण्यात यशस्वी झालेला नाही. बोर्ड आणि महामंडळाच्या ५० हून अधिक नियुक्त्यांमुळे ही आघाडी मजबूत होऊ शकते.

ज्या नेत्यांना खासदार, आमदार म्हणून संधी मिळालेली नाही, त्यांना या माध्यमातून लोकांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

You might also like
2 li