रायगड : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीच्या सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलताना कार्यकर्त्यांना झापले आहे.
शिवनेरी (Shivneri) किल्ल्यावर अजित पवार यांनी जनतेला संबोधित केले त्यावेळी कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाविषयी अजित पवारांना विचारले असता अजित पवार भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.
यावेळी अजित पवार म्हणले की, बाळासाहेब थोरात काय, दिलीप-वळसेपाटील आणि मी असेल, आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हालाही मराठा (maratha) समाजाला आरक्षण द्यायचे आहे.
आरक्षण (Reservations) खोळंबून ठेवायला आम्हाला काय आनंद वाटतो का? असा सवाल करतानाच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.
त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काही कायद्याच्या अडचणी आहेत. त्यातून मार्ग काढूनच आम्ही पुढे जात आहोत अशा शब्दात कार्यकर्त्यांना त्यांनी झापले आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, इतर समाजाला दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा आम्ही नियम केला. सर्व आमदारांनी तसा ठराव केला.
२८८ आमदारांनी ठराव केला. पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कायदा आणि सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे. काही राज्यात वेगवेगळे आरक्षण मागितले जाते.
बाळसााहेब थोरात, सीताराम कुंटे, मुख्यमंत्री आणि मी असे चार पाच जण पंतप्रधानांना भेटलो. आम्ही पंतप्रधानांकडे १२ मागण्या केल्या.
त्यातील मराठा आरक्षणाची पहिली मागणी होती. पंतप्रधानांनी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.