राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी लष्कारानेही ऑपरेशन वर्षांतर्गत मदत कार्य सुरू केले आहे. बचाव कार्यासाठी पुण्याच्या दक्षिण मुख्यालयात मदत सहाय्यता मोहीम ‘वाॅर रूम’ची स्थापना करण्यात आली असून येथून बचाव पथकांना सूचना दिल्या जात आहे.

दहा अतिरिक्त पथके सज्ज

महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि अन्य जिल्ह्यांतील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे.

येथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. आणखी अतिरिक्त दहा पथके आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

Advertisement

२५ पथके मदतीसाठी रवाना

राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे सत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

अनेक गावे पाण्याखाली गेले आहेत. सध्या स्थानिक प्रशासन, एनडीआरएफच्या पथकाद्वारे बचाव कार्य सुरू आहे. राज्य शासनाच्या मागणीनुसार लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे.

त्यानुसार दक्षिण मुख्यालयाअंतर्गत आैंध मिलिटरी स्टेशन आणि बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे १५ पथके अन्नधान्य आणि वैद्यकीय मदतीसह बचाव कार्यासाठी पाठवण्यात आली होती. आणखी दहा पथके बचावकार्यासाठी पाठवण्यात आली.

Advertisement

बचावकार्य सुरू

सांगली, पलूस, बुर्ली आणि चिपळूणमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी ही पथके तैनात करण्यात आली असून, आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हे बचाव कार्य शेवटपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.