पुणे : आरोग्य पेपर (Health Paper) फुटीप्रकरणी सायबर पोलिसांची (Cyber ​​Police) कारवाई सुरु आहे. अशातच आता बीड (Beed) मध्येही या प्रकरणाबाबत १ जणाला अटक करण्यात आली आहे.

संजय शाहूराव सानप (वय ४०) असे सायबर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या पेपर फुटीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १८ जणांना अटक केली आहे.

यामध्ये विशेष म्हणजे बीडमधील ८ आरोपी आहेत. भूम, उस्मानाबाद येथील ग्रामीण रुग्णालय सहायक अधीक्षक (Rural Hospital Assistant Superintendent) कार्यालयातील संजय सानप याला अटक केली आहे.

Advertisement

संजय सानप याने आरोग्य विभागाचे गट क व गट ड चे पेपर पुरवल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पोलीस निरीक्षक मीनल सुपे (Police Inspector Minal Supe) व त्यांच्या सहाय्यकांनी या आरोपीला अटक केली आहे.

आरोपीला सोमवारी शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court) हजर केले. संजय सानप याला आरोग्यविभागाचा पेपर मिळाला असल्याची माहिती सरकारी वकील विजयसिंह जाधव (Government Advocate Vijay Singh Jadhav) ​यांनी दली.

आरोपीकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. त्याने किती जणांना पेपर दिला आहे आणि किती लोकांकडून पैसे घेतले आहेत याबाबत सखोल तपस करायचा आहे.

Advertisement

त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाकडे ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. २३ डिसेंबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.