आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शिवाजी पार्क परिसरात आंदोलन सुरू केले आहे. बारा आमदारांना निलंबित केल्याप्रकरणी हे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते शिवसेना भवन परिसरात येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे असंख्य शिवसैनिकांनी शिवसेना भवन परिसरात मोठी गर्दी केली आहे. या शिवसैनिकांकडून शिवसेना भवन परिसरात बंदोबस्त दिला जात आहे.

Advertisement

शिवसेना-भाजप वारंवार आमने सामने

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादर, वरळी, माहिम, माटुंगा या भागात शिवसेना-भाजप वारंवार समोर येत आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवसेना भवन येथे झालेल्या राड्यानंतर भाजपने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसलं आहे.

Advertisement

शिवसेना भवनावर मोर्चा काढणे चुकीचे

मागच्या प्रकरण झाल्यानंतर त्यांना आम्ही धडा शिकवला होता. भाजपने त्यातून बोध घ्यायला हवा होता; पण दुर्देवाने भाजप जुना भाजप राहिलेला नाही.

भाजपमध्ये काही नवीन लोकांना प्रवेश दिल्याने त्यांना शिवसेना भवनाचे महत्त्व माहिती नाही. जुन्या लोकांना त्याचे महत्त्व माहिती होते. ती पवित्र वास्तू आहे.

या पवित्र वास्तूमुळे भाजपही महाराष्ट्रात मोठा झाला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मोर्चा काढणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

Advertisement

12 आमदारांचं निलंबन

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा झाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली.

इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आला. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

Advertisement