पैसे दिले नाही, तर उडवून देण्याची धमकी देऊन पन्नास लाख रुपयांची खंडणी मागणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली.

नही तो ठोक दुँगा

‘पचास लाख रूपये दे नहीं तो ठोक दुँगा, कल तक पैसे रेडी रखना, मैं जो बोल रहा हूं वह सुननेका, पैसे का इंतजाम रखनेका, पोलिस को पता लगा तो अंजाम जानता है, तेरा खानदान तो पुरा गया..’अशा शब्दांत एका अनोळखी फोनवरून मोठ्या व्यावसायिकाला धमकी देत 50 लाख रूपयांची खंडणी मागितली.

ही आहेत अटक केलेल्यांची नावे

औंध येथे रक्कम देण्यासाठी आरोपींनी व्यावसायिकाला बोलावले आणि रक्कम स्वीकारताना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले.

Advertisement

त्यातील एक व्यावसायिकाकडे पूर्वी चालक म्हणून काम करीत होता आणि त्याने 2016 मध्ये काम सोडले असल्याचे समोर आले आहे.

अजुहरददीन शेख (वय 24; रा; शाहूनगर चिंचवड, मूळ पश्चिम बंगाल) आणि संतोष देवकर ( वय 32 रा. शाहूनगर चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार बांधकाम व्यावसायिक

तक्रारदार यांची कंपनी आणि कन्ट्रकशनचा व्यवसाय आहे. गेल्या आठवड्यात (दि.16 ) त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि त्यांच्याकडे 50 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. तक्रारदारांनी तत्काळ खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली.

Advertisement

आरोपींनी पुन्हा फोन करून त्यांना रक्कम कुठे आणून द्यायची याची जागा सांगितली. औंध येथे त्यांना पैसे आणण्यास सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि अजुहरददीन शेख याला पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

कर्ज फेडण्यासाठी आरोपीने रचला कट

संतोष देवकर हा पूर्वी व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करीत होता. त्याच्या सांगण्यावरून अजुहरददीन शेख याने व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचे तपासात समोर आले आहे.

व्यावसायिकाने संतोष यास वेळोवेळी आर्थिक मदत केलेली होती. त्यांच्या आर्थिक आणि मानसिक परिस्थितीचा अंदाज घेत स्वत:चे कर्ज फेडण्यासाठी त्याने हा कट रचला असल्याची कबुली पोलिसांना दिली.

Advertisement