ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पाच दरोडेखोरांकडून तब्बल ९५ तोळे सोन्याचे दागिने केले हस्तगत!

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच अट्टल दरोडेखोर जेरबंद केले असून त्यांच्याकडून तब्बल आरोपींकडून ९५ तोळे सोन्याचे दागिने (यांची किंमत ४७ लाख ५० हजार रुपये) जप्त केले आहेत.

या सर्वांना पोलिसांनी औरंगाबाद, अक्कलकोट येथील जंगलातून ताब्यात घेतले. यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहे.

लिंग्या उर्फ अजित व्यंकप्पा पवार, आप्पा रा. भोसले, त्याची साथीदार पत्नीे, अक्षय मंगेश शिंदे, अजय रिका उर्फ राहुल पवार या पाच जणांना अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी घराच्या खिडक्यांचे गज कापून घरफोडी व चोरी करणाऱ्यापैकी लिंग्या उर्फ अजित व्यंकप्पा पवार हा औरंगाबाद येथे नातेवाईकाकडे आश्रयास असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त केले. त्याने त्याच्या चार साथीदारांची नावे सांगितली.

हे सर्वजण अक्कलकोट, सोलापूर, उस्मानाबाद, करमाळा येथील जंगलभागात वास्तव्य करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांना मिळाली. त्यानुसार आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली.

पोलिसांनी अक्कलकोट परिसरात तब्बल चार दिवस वॉच ठेवून जंगलात वास्तव्य करणाऱ्या तिघांसह आनखी एकास ताब्यात घेतले. सर्व आरोपींकडून पोलिसांनी एकूण ४७ लाख ५० हजारांचे ९५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

You might also like
2 li